HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्यात काल 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

मुंबई। कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत  चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 139  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 11  हजार 075  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे.

राज्यात कुठे किती रुग्णसंख्या

राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 281  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (2),  धुळे (8), जालना (37), परभणी (53), हिंगोली (18), नांदेड (14),  अमरावती (96), अकोला (27), वाशिम (05), बुलढाणा (14), यवतमाळ (08), नागपूर (70),  वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3),   गडचिरोली (13 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 481 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 481 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1102 दिवसांवर गेला आहे.

Related posts

डिजीधन मेळाव्यातील लोकराज्यच्या दालनास खोतकर यांनी भेट दिली

News Desk

वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीनं राज्यशासन घेणार मोठा निर्णय- अजित पवार

News Desk

हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk