HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम

मुंबई – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चाच्यावतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मुंबई, ठाणे नवी मुंबईत या चक्काजाम आंदोलनाचा वाहतूकीवर परिणाम जाणवला. औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी हे आंदोलन सुरळीत पार पडले.

ठाण्यातील डोंबिवली, नवी मुंबईतील कामोठे-कळंबोली, मुलुंड चेकनाका, दहिसर येथे चक्काजाम आंदोलन झाले. डोंबिवली व ठाणे येथे चक्काजाम आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम जाणवला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. पिंपरी-चिंचवड येथील भूमकर चौक येथे मुंबई-पुणे महामार्गावर १० मिनिटे चक्काजाम करण्यात आले. शेवटी पोलिसांनीच आंदोलकांना बाजूला करत महामार्ग मोकळा केला.

ग्रामीण भागातही चक्काजाम करण्यात आले. दरम्यान, औरंगाबाद येथे चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. शहरातील आकाशवाणी, वाळूज येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. प्रारंभी पोलिसांनी आंदोलकांना चक्काजाम करण्यास विरोध केला. आंदोलकांनी नकार देताच त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. शहरातील न्यायालयाजवळ आंदोलकांनी एका कारची काच फोडली. चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी राज्यात सगळीकडे मोठा फौजफाटा तैनात केला होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

राज्यात सर्वच ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोलापूर, जळगाव, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी ग्रामीण भागातही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. काही वेळच झालेल्या या आंदोलनाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिकला शांततेत आंदोलन झाले. वाहतुकीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

दरम्यान, हे आंदोलनही यापूर्वी करण्यात आलेल्या महामूक मोर्चाप्रमाणे शांततेत केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्कारामधील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आंदोलन होण्यासाठी ठरविलेल्या ठिकाणीच आंदोलने करण्यात आली.

आंदोलनासाठी आयोजकांनी आचारसंहिता तयार केली असून त्याप्रमाणेच हे चक्क जाम आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिस्तबद्ध आंदोलन करणे, कोणीही गालबोट लावू देऊ नका, गालबोट लावणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांना द्या, वाहनांवर दगडफेक करू नका, वाहनांची हवा सोडू नका, रस्त्यावर टायर पेटवू नका, अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्या, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे कुटुंबियांकडून रोशनी शिंदेंची भेट; तब्येतीची केली विचारपूस

Aprna

खासदार अमोल कोल्हेंनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

News Desk

एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा! – उपमुख्यमंत्री

Aprna