HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आज  3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 52 जणांचा मृत्यू!

मुंबई। राज्यात आज 3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 685 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 12 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 06 टक्के आहे.राज्यात आज 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कुठे किती आहे रुग्णसंख्या

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 101 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (10), नंदूरबार (2), धुळे (1), जालना (36), परभणी (55), हिंगोली (17), नांदेड (25), अकोला (29), वाशिम (01), यवतमाळ (05), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), चंद्रपूर (51), गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 5,62,25,304 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,04,147 (11.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,96,176 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,875 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील 24 तासात रुग्ण संख्या

मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,12,570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4696 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1286 दिवसांवर गेला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत दाखल होणार, पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

News Desk

संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबाबतचे ‘ते’ विधान मागे

News Desk

“महापालिका निवडणुकात शिवसेना टिकणार नाही!”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk