HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ५ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (४ नोव्हेंबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ८ हजार ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त झालेल्या एकूण संख्या आता १५ लाख ४० हजार ५ वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा एकीकडे १५ लाखांच्या पार गेलेला असताना आता राज्याचा कोरोना रिकव्हरी रेटही वाढत आहे. महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट आता 90.68% इतका झाला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख १२ हजार ९१२ ऍक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णलयांत कोरोनावर उपचार घेत आहेत. जीवजीवन रुळावर आणण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असणारे अनेक नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. मात्र, नागरिकांनी जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा दावा

Aprna

देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा यांची बैठक

News Desk

सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना विचार करा, नाहीतर …!

News Desk