HW News Marathi
देश / विदेश

देशातील १४ राज्यात तबलिकी समाजामुळे ६४७ जणांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकताच दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी देशातील १४ राज्यांतील तबलिगी समाज मरकजमध्ये सभहभागी झाला होता. यामुळे आता गेल्या दोन दिवसांत तबलिगी जमातशी संबंधित ६४७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने आज (३ एप्रिल) पत्रकार परिषदेतून दिली. सध्या देशातील नव्या रुग्णांची संख्याही मरकजहून आलेले जवळपास ६५ टक्के रुग्णांचा संबंधित आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यालयाने दिला आहे.

दिल्ली काल (२ एप्रिल) एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या २९३ इतकी होती. त्यातील १८२ जण मरकजशी संबंधित असून मरकजला सहभागी झालेल्यापैकी तिघांचा गेल्या २४ तासांत दिल्लीत मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५६ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तमिळनाडूत आज कोरोनाचे १०२ नवे रुग्ण आढळले. यातील १०० जण निझामुद्दीनमधील मरकजला उपस्थित होते. त्यामुळे तमिळनाडूतील कोरोनाबाधितांचा आकडा ४११ वर पोहोचला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-कश्मीर निवडणुकीदरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक

Gauri Tilekar

रॉबर्ट वाड्रा यांना मोठा दिलासा, जप्त करण्यात आलेले दस्तावेज परत करण्याचे निर्देश

News Desk

धनंजय मुंडे – संजय दौंड यांचे राजकीय शत्रुत्व ते मैत्री..

Arati More