HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरात अजित पवारांच्या सभेत ८ कोरोना पॉझिटिव्ह, सरकारचे निर्बंध धाब्यावर

पंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे सराकारने कोरोना काळात कोणत्याही सभा घेण्यास मनाई केली आहे. असं असतानाही सरकारमधीलच काही नेते हे नियम मोडताना दिसत आहेत. ८ एप्रिलला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली होती. दरम्यान, या सभेत ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर संपूर्ण मंगळवेढ्यात ४२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाचे संकट जोमात असताना निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर केली आणि प्रचारासाठी मंत्र्यांच्या होऊ लागलेल्या मोठं मोठ्या सभेमुळे होत असलेल्या गर्दीत करोना वाढू लागल्याचे समोर आले आहे. गेले दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर आणि मंगळवेढा भागात जोरदार सभा झाल्या. दादांना ऐकायला मतदारांनीही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत गर्दी केली. याच पद्धतीने भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही जोरदार सभा झाल्याने गर्दी झाली होती.

दरम्यान, भाजप नेते कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तौबा गर्दी जमवत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. याप्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १८८ नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर

News Desk

पुण्यात पीएमपीएल बस पुलावरून कोसळली

News Desk

जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी बीड जिल्ह्यात केली अतिवृष्टीची पाहणी!

News Desk