HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : देशातील ८० टक्के कोरोनाबाधितांमध्ये लक्षणचे नाहीत ! कोरोनाच्या या प्रकाराबद्दल जाणून घ्या …

मुंबई | चिंताजनक ! देशातील ८० टक्के कोरोना बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. लक्षणे दिसून न येणे ही एक चिंताजनक बाब आहे. कारण लक्षणे दिसून न आल्याने आपल्या लक्षातही येत नाही. आता कोरोनाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. याउलट जर लक्षणे दिसून आली तर तो व्यक्ती सतर्क होतो.

महाराष्ट्रात आतापर्यंत १२ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८१ टक्के कोरोना बाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. ते रुग्णालांमध्ये निवांत बसून आहेत. ते निवांत टीव्ही बघत आहेत आणि वृत्तपत्रे वाचत आहेत. लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या १७ टक्के आणि आयसीयूमध्ये असणाऱ्यांची संख्या २ टक्के आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून टेस्टसाठी पुढे या, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

सायलेंट कॅरिअर ३ विभागांमध्ये विभागले जाऊ शकते

  • पूर्णपणे लक्षणे नसलेला म्हणजे Asymptomatic
  • सुरुवातीच्या काळात लक्षणे असलेला म्हणजे Presymptomatic
  • अगदी सौम्य लक्षणे असलेला Very Mildly Symptomatic
  • Asymptomatic म्हणजे अजिबात लक्षणे न दिसणे. हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असताना मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाही. अनेक केसेसमध्ये अगदी टेस्ट झाल्यानंतरसुद्धा त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे एखादा वरवर धडधाकट दिसणारा व्यक्त देखील सायलेंट कॅरिअर ठरू शकतो.इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतोPresymptomatic म्हणजे सुरुवातीच्या ६ते ७ दिवसांच्या काळात लक्षणे दिसत नाहीत. पण बाधित व्यक्तीला व्हायरसची लागणही असते आणि तो त्याच्याकडून इतरांना संक्रमित देखील होऊ शकतो. म्हणजे लक्षणे दिसण्यापूर्वीच संसर्गाला सुरुवात झालेली असते. लक्षणे उशिरा दिसतातVery Mildly Symptomatic खूप कमी प्रमाणात अगदी सौम्य लक्षणे दिसतात. ज्यामुळे हा साधा सर्दी-खोकला आहे की कोरोनाचे लक्षणे ते समजत नाही. अनेकदा अगदी साधा आजार मानून लोक घरच्याघरी उपचार करू लागतात. त्यामुळे हि लोक आपली कामे सुरूच ठेवतात. त्यामुळे हा रोग अजाणतेपणाने पसरतो
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जे जे चुकेल त्याला शासन आहे”, अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर भाजपची प्रतिक्रिया  

News Desk

मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय हे राज्यकर्ते सांगून का टाकत नाहीत? ब्राह्मण महासंघांचा सवाल

News Desk

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले नवजात बाळाचे पालकत्व

swarit