HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धवसाहेब ‘हा’ खेकडा तर शिवसेना पोखरत आहे !

उस्मानाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्योग आढावा बैठक आज (९ जानेवारी) बोलविण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेचे नाराज आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे अनुपस्थित होते. महाविकासआघाडीत मंत्री पद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत हे पक्षावर नाराज आहे. त्याचप्रमाणे विशेष अधिवेशनादरम्यानही तानाजी सावंंत गैरहजर होते.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी काल (८ जानेवारी) उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या गटाने भाजप आघाडीला पाठिंबा दिला. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली. या प्रकरणामुळे सोलापुरातील नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आले आहे.

खेकड्याच्या चित्रावर तानाजी सावंत यांचे फोटो लावण्यात आले आहे. या बॅनरवर “उद्धवसाहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे…वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” असा मजकूर असलेला बॅनर सोलापूरत लावले आहे. हा बॅनर सोलापुरातील मेकॅनिक चौक परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Suman R R Patil Exclusive | रोहित आबांचा वारसा चालवणार .. आबांच्या जनतेला मी वाऱ्यावर सोडणार नाही !

News Desk

कौशल्य विकासाला आता मिळणार सीएसआरची जोड; राज्य शासनही देणार आर्थिक योगदान; राजेश टोपेंची माहिती

Aprna

पीडितेच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासन आणि शिवसेना स्वीकारणार – एकनाथ शिंदे

News Desk