HW News Marathi
महाराष्ट्र

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह सापडला

ठाणे | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळून आला होता, त्याच ठिकाणी आज (२० मार्च) आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही आत्महत्या आहे, हत्या, घातपात की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!

News Desk

राज्यसभेतील राजीव सातवांच्या रिक्त जागी पृथ्वीराज चव्हाणांना संधी द्या!

News Desk

फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

News Desk