Site icon HW News Marathi

इंदापूर तालुक्यात विमान कोसळले; महिला वैमानिक जखमी

मुंबई | इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात एका शेतात विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान कारवार एव्हिएशनचे (Carver Aviation plane)  असून या विमानात एक वैमानिक जखमी झाला असून या वैमानिकाला उपचारासाठी नवजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, कारवार एव्हिएशनच्या वतीने महिला वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. बारामतीत आज (25 जुलै) सकाळी बारामतीतून कारवार एव्हिएशन विमानाने उड्डाण घेतले होते. यानंतर एव्हिएशन विमानाने दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले.  या अपघातात महिला वैमानिक जखमी झाली आहे.

या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून या घटनास्थळी कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

Exit mobile version