HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील केमिकल कंपनीला आग, १५ महिला तर २ पुरुष कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे । पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीतील क्लोरिफाईड कंपनीत आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या कंपनीचे नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असे आहे. यात १५ महिला आणि २ पुरुष कर्मचाऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या आगीमागचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

पुण्यातील या क्लोरिफाईड कंपनीच्या दुर्घटनास्थळी प्राथमिक माहितीनुसार, १५ ते २० कामगार अडकून पडले होते. या कंपनीत आज (७ जून) सकाळी एकूण ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी १७ कर्मचारी बेपत्ता असल्याचे म्हटले जात होते. स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी याबाबतची माहिती दिली होती. मात्र, आता एकूण १७ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यातील या कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्याने इथे आगीने मोठा पेट घेतल्याचा अंदाज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन, तरुण भारतमधून राऊतांवर टीका

News Desk

राज्यातील विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कुशल कामगारांना होणार लाभ ! | नवाब मलिक

News Desk

एल्गार परिषदेसंदर्भात पुणे पोलिसांना ६ फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्याची मुदत

swarit