HW News Marathi
महाराष्ट्र

महालक्ष्मीमधील विठ्ठल निवास इमारतील आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई | महालक्ष्मीमध्ये विठ्ठल निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागील आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष झाली नाही. परंतु, या आघीत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती मिळाली आहे. इमारतीला आज (२३ मार्च) दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास आग लागली होती. या आगीमुळे महालक्ष्मी परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. 

इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीला लागलेल्या आगीने अचानक रौद्र रुप धारण केल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी केली आहे. इमारतीला आग लागल्याचे कळाल्यानंतर नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, इमारतीचे नुकसान झाले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच!

News Desk

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास सुरुवात

News Desk

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

News Desk