HW News Marathi
महाराष्ट्र

समविचारी पक्षांची लवकरच बैठक आयोजित करणार  ! –  के. चंद्रशेखर राव

मुंबई। समविचारी पक्षांची लवकरच बैठक आयोजित करणार, असे संकेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विरोधकांना दिले आहेत. राव यांनी आज (२० फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप विरोधात तिसरी आघाडीची मोर्चे बांधणी तयारी करत असल्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांना भेटण्यापूर्वी राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

राव म्हणाले, “तेलंगणा राज्य वेगळे तयार होत असताना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. यामुळे तेलंगणाची जनता त्यांना कधी विसरणर नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात काम करायचे आहे. यामुळेच समविचारी पक्षांची लवकरच बैठक आयोजित करणार असून त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आणि आमची भूमिका स्पष्ट करू, असे ते म्हणाले.

देशाच्या विकासावर चर्चा – शरद पवार

देशात आज गरिबी, बेरोजगारी समस्या यासारख्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी राव यांच्या सोबच्या बैठकीत चर्चा झाली. भेटीदरम्यान, राजकीय चर्चा न करता फक्त देशाच्या विकासावर चर्चा करण्यात आली, असे शरद पवार म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे – मुख्यमंत्री

News Desk

पंख्याला लटकलेला आढळला वहिणी-दिराचा मृतदे

News Desk

तुकाराम मुंढेंची बदली मला त्रास देण्यासाठी केली असेल तर…फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

News Desk