HW News Marathi
महाराष्ट्र

‘आदित्य संवाद’ नंतर आता शिवसेनेचा ‘माऊली संवाद’

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता शिवसेनेने आणखी एक नवा उपक्रम राबविण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे आता ‘माऊली संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेच्या या ‘माऊली संवाद’ उपक्रमाला २ ऑगस्टपासून सुरुवात होईल.

निवडणुकीत एकूण मतदारांपैकी निम्म्या महिला मतदार आहेत. त्यामुळे महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेकडून ‘माऊली संवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे. आदेश बांदेकरांच्या ‘माऊली संवाद’ या उपक्रमाची सुरवात २ ऑगस्टपासून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी बहूल तालुक्यातून होणार आहे. तर ३ ऑगस्ट रोजी ते भिवंडी येथे दाखल होतील. त्याचप्रमाणे, ४ ऑगस्ट रोजी आदेश बांदेकर बीड येथे आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस,प्रवचने झाडणे बंद करा आता ! सामनातून टोला…

News Desk

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी, गुणरत्न सदावर्तेंसह 115 ST कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

Aprna

“… साखर आयुक्तांनी आदेश मागं घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ”, राजू शेट्टींचा इशारा!

News Desk