HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ‘आप’ने उघडले खाते, केजरीवालांचे मराठीत ट्विट

मुंबई । राज्यात सध्या फक्त आणि फक्त ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांची चर्चा आहे. या निवडणुकांचे सर्व निकाल हाती यायला आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आपले खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत ‘आप’चे ७ पैकी ५ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. लातूर जिल्ह्याचे आपचे जिल्ह्याध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात ‘आप’ दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत ५ जागेबर विजय मिळवत ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

 

महाराष्ट्र ग्रामपंचायतीतील या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी मराठीत ट्विट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल म्हणतात की, “विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.” दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार सर्वच राजकीय पक्ष सध्या या निवडणुकीत आपलीच सरशी होणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र, खरं चित्र काहीच तासांत स्पष्ट होणार आहे. अंतिम निकाल काय लागतात ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्यांना अक्कलेचे धडे मिळाले”, नाव न घेता नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

Aprna

‘चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला?’

News Desk

पेट्रोल २ रूपयांनी तर डिझेल १ रूपयांनी होणार स्वस्त

News Desk