HW News Marathi
महाराष्ट्र

कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्रमध्ये ट्रान्सपोर्ट विंग सुरू

मुंबई | आम आदमी पार्टीच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मध्ये नव्याने ट्रान्सपोर्ट विंग सुरू करण्यात येणार आहे. त्याच बरोबर कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्या. त्यांच्या मेहनतीचा पूर्ण मोबदला त्यांना देण्यात यावा, आशा विविध मागण्यांसाठी अंधेरी चकला ते बांद्रा कार्टरोड पर्यंत १ मे ला भव्य रॅलीचे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी रॅली नंतर सभेचे आयोजन करण्यात येणार असून पक्षातील मान्यवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आम आदमी पार्टीची ट्रान्सपोर्ट विंग दिल्लीत कार्यकरत असून उत्तम काम करत असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनाही याचा फायदा व्हावा यासाठी पक्षाने महाराष्ट्रातही काम करण्याचे ठरविले असल्याचे शनिवारी आम आदमी पार्टीच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, मी दिल्लीत या ट्रान्सपोर्ट विंगचे काम पाहिले याचा फायदा निश्चितच तिथल्या वाहन चालकांना झाला, तसाच तो महाराष्ट्रातील लोकांनाही होईल असा विश्वास आहे. तसेच ही विंग महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी १ मे कामगार दिन हा उत्तम दिवस असल्यामुळे आम्ही कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात ही विंग कार्यरत करत आहोत. कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही ३ जून रोजी सी. एस. टी. च्या आझाद मैदानावर भव्य सभेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र मधील अनेक कामगार संघटना एकत्र येऊन आपल्या मागण्या सरकार पुढे मांडणार आहेत.

पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन म्हणाल्या, भाजप सरकार विरोधी पक्षात असताना त्यांनी आंदोलने केली. आज सामान्य माणसांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. आज चांगल्या रस्त्यांची गरज आहे, असे रस्ते किमान त्यावरून साधी वाहने जाऊ शकतील. ट्रान्सपोर्ट संदर्भात विविध मागण्या १ मे च्या मोर्चानंतर सरकार पुढे ठेवण्यात येतील असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

मराठा मोर्चा, शेतकरी मोर्चा असे अनेक मोर्चे भाजपच्या काळात निघाले. परंतु या सर्व मोर्चा नंतर किती मोर्चातील मागण्या मान्य झाल्या हा मात्र सध्या अभ्यासाचा विषय आहे. १ मे रोजी आम आदमी पार्टीच्या मोर्चा नंतर कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेच्या टीकेला बहीण प्रीतम मुंडेंच सडेतोड प्रतिउत्तर!

Aprna

नारायण राणे यांना शिवसेनेचा ग्रीन सिग्नल! म्हणाले…..

News Desk

महागाईविरोधात ३१ मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह! – नाना पटोले

Aprna