HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवूडशी संबंध आहेत असे पत्रक काढणारे वांद्रेत राहतात, अशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई | “बॉलिवूडशी नाते सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असे म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचेही नाव पुढे आले होते. यावरुन आधीही भाजपने टीका केली होती. इतकेच नाही तर गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

“वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून तिथे प्रामाणिक मतदार राहतात. बॉलिवूडचे अनेक लोक तिथे राहतात मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील कांदिवली या ठिकाणी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर केले होते. या कारणामुळे ही मारहाण करण्यात आली होती. या मुद्द्यावरही आशिष शेलार यांनी टीका केली. गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत आहेत असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला! – देवेंद्र फडणवीस

Aprna

ज्याच्याकडे पैसा त्याच्या मुलाला जामीन मिळतो; आर्यन खान प्रकरणी औवेसींची प्रतिक्रिया

News Desk

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन त्यावर प्रतिक्रिया देऊ – गृहमंत्री

News Desk