HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा” ठाकरे सरकारवर टीका

मुंबई | राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये वारंवार आरोपांची मालिका पाहायला मिळते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर टीका होत असते. भाजप नेते आणि आमदार अशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘चेहरा भोळा आणि भानगडी सोळा’, असं हे सरकार आहे, असं म्हणत अशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज भाजप पक्षाची कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यावेळी अशिष शेलार बोलत होते. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला, असं हे सरकार आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना आशिष शेलार यांनी, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितलं की, मला पूर्णपणे बाजू मांडण्यास सरकारने मदत केली नाही. याला जबाबदार कोण? मराठा आरक्षणात झालेली चुक होती की, हा ठरवून केलेला कट होता. सरकारने याच आता उत्तर द्यायला हवं, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथं अहंकाराचं सरकारच नव्हतं, असंही शेलार म्हणाले आहेत.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज मोठी बैठक

News Desk

मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची टीका

News Desk

स्वबळावर सर्व निवडणुका जिंकण्यासाठी संघटन मजबूत करणे हाच संकल्प !

News Desk