HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अभिजीत बिचुकले पंढरपूरला रवाना

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी पालकांसाठी मनाई केली आहे. आषाढी साठी पंढरपुरात संचारबंदी करण्यात अली आहे. यातच मुख्यमंत्री सहकुटुंब पंढरपूरला महापूजेसाठी निघाले आहेत. त्यांच्या जाण्याने विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे आई त्यांच्याकडून टीका केल्या जात आहेत. उद्धव ठाकऱ्यांच्या पाठोपाठ आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे देखील पंढरपूरला जाण्यासाठी निघाले आहेत.

अभिजित बिचुकले पंढरपूरला रवाना

अभिजित बिचुकले हे नेहमीच त्यांच्या आक्रमक वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांपाठी पंढरपूरला निघाले आहेत. “तुम्हाला माहितीच आहे आणि मी सांगितलं होतं की आषाढी एकादशीला मी पंढरपूरला जाईल. तर, त्याप्रमाणे मी निघालो आहे. त्यांनी संपूर्ण नाकेबंदी केलेली आहे. परंतु भगवंताच्या मनात असेल, तर मी पोहचणार आहे. पण मी सांगू इच्छितो की एका बाजूला तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवत आहात, राजकीय मेळावे घेत आहात तिथं हजारो लोक येतात. मग पंढरपूरला माऊलीचं दर्शन घ्यायला सज्जन अशा वारकऱ्यांना तुम्ही का रोखलं आहे? म्हणजे इंग्रजांपेक्षा तुमचं राज्य वाईट वाटतं.”, असं त्यांनी सांगितलं आहे.

मी जर पूजेला नसेन तर त्याला अर्थ नाही

अभिजित बिचुकले यांनी अजून एक विधान केलं आहे, “दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंढरपूरमध्ये जी पूजा करतील, त्यांना मी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून, पहिली पायरी जी असते ती चोखाबाची असते आणि चोखोबा जर उद्या पूजेला नसतील म्हणजे अभिजीत बिचुकले तर पूजा काय यशस्वी नाही असं माझं ठाम मत आहे.” असं देखील बिचुकले यांनी बोलून दाखवलं आहे.

मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.उद्या (२० जुलै २०२१) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज (१९ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला.

मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले म्हणजे अर्धे शटर बंद झालेले दुकान !

News Desk

जळगावकडे जाताना एकनाथ खडसेंच्या गाडीचा अपघात, सर्वजण सुखरुप

News Desk

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

News Desk