HW News Marathi
महाराष्ट्र

नागपुर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी! 

नागपूर | राज्यात विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान, या निकालाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपच्या जोशी यांना मोठ्या मतांच्या फरकाने हार मानावी लागली.

नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही.

यानुसार वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता ते विजयी प्रमाणपत्र घेण्यास मतदान केंद्रावर जाणार आहेत. काल (३ डिसेंबर) दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्र्यांचा जर एकेरी उल्लेख केला असता तर…जयंत पाटलांचा टोला 

News Desk

पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून पाहिले जाणारे; शेकपाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील हरपले

Aprna

“आपण ज्या नर्सरीत शिकता, त्या संस्थेचे संस्थापक शरद पवार आहेत”, राष्ट्रवादीने सदाभाऊ खोत यांना सुनावले

News Desk