HW News Marathi
महाराष्ट्र

संतापाच्या भरात थेट धनंजय मुंडेंची गाडी अडवून न्याय देण्याची केली मागणी!

बीड | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे  बीड मतदार संघातील विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम आटोपून धनंजय मुंडे  गाडीत बसून त्यांचा ताफा निघाला असता. मयत पित्याला न्याय मिळाला या आशेने दोन बहिणी ने थेट धनंजय मुंडे यांच्या गाडी समोर येत गाडी थांबवली व आपले गाऱ्हाणे मांडले. तिसऱ्यांदा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची काल (८ फेब्रुवारी) भेट घेतली. या दोन बहिणींच्या म्हणण्या प्रमाणे पोलिसच आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी मयत शेतकऱ्यांच्या मुलींनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची चक्क गाडी अडविली. आमचे वडील गेले आता तरी न्याय द्या अशी मागणी केली,विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी दोन वेळा अश्वासन दिलेले मात्र अद्यापही काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी त्या मुलींना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या विरोध झुगारत या मुलीने थेट पालक मंत्री महोदया पाशी आपले गाऱ्हाणे मांडले

बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे संभाजी वडचकर यांचा भावकीच्या वादातून मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी वडवणी पोलिसात गुन्हा देखील दाखल आहे मात्र यात ३०२ चे कलम अद्यापही वाढविलेले नाही, तसेच आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटकही केली नाही पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या वडचकर यांच्या किर्ती व प्रिती या दोन मुलींनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पालकमंत्र्या समोर उपस्थित केला. बीड जिल्ह्यातील लहान-मोठा प्रकरणात थेट पीडितांना पालकमंत्री महोदयांच्या गाडीला आडवे थांबावे लागते तसेच पालकमंत्र्यांनी दोन वेळा दिलेल्या आश्वासन देखील पूर्ण होत नाही यामुळे जिल्ह्यातील एकूणच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्न संदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आणि शाहू महाराज यांची भेटी; मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून केली चर्चा

Aprna

महाराष्ट्रातील टोलसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुुसे यांच्या बैठकीत झालेले निर्णय 

Sanjay Jog

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात!

News Desk