HW News Marathi
महाराष्ट्र

विधानभवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई व्हावी !

मुंबई | “मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (५ जुलै) विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस असून भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न केला त्यावर जयंत पाटील यांनी विरोधी सदस्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला आहे.

“आज विधानसभेत बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे”, असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

भाजपचे हे १२ आमदार निलंबित


OBC आरक्षणावरील ठरवादरम्यान राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सोमवारी (५ जुलै) भाजपच्या एकूण १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या वर्षभरात या १२ आमदारांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मनाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार पडण्याचा प्रयत्न करणे ही आमची संस्कृती नाही -चंद्रकांत पाटील

News Desk

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता

News Desk

परंतु हिशोब तर द्यावाच लागणार…सोमय्यांचा राऊतांना इशारा 

News Desk