Site icon HW News Marathi

रितेश-जेनेलिया यांच्या कंपनीला 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर, लातूर एमआयडीसीत भूखंड; भाजपकडून भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्यांची पत्नी जेनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या कंपनीला  लातूर एमआयडीसीत (Latur MIDC) भूखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. देशमुख दाम्पत्याची कंपनी देश अॅग्रो प्रा. लिमिटेडला महिन्याभरात 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे असून या भूखंडात भ्रष्टाचार झाला आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. यामुळे देशमुख दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दरम्यान, 2019 मध्ये लातूर एमआयडीसी भागातील भूखंडासाठी 16 उद्योजकांनी प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलून रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. तसेच रितेश आणि जेनिलिया यांच्या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटी कर्जा केस दिले?, असा सवाल भाजपने पत्रकार परिषदेतून केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली

या पत्रकार परिषदेत भाजपने भूखंडताली काही महत्वाचे मुद्दे अधोरिकेत केले. रितेश आणि जेनिलिया यांच्या कंपनीला २२ जुलै २०२१ रोजी भूखंडाचा दाबा देण्यात आला. यानंतर रितेश आणि जिनिलिया यांच्या कंपनीने पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँकेत ४ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्जासाठी अर्ज केला होता. लातूर जिल्हा बँकेत ५ ऑक्टोबरला अर्ज, ६१ आणि ५५ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. आणि यांना एका महिन्यात म्हणजे २७ ऑक्टोबरला पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँकेने कर्ज मंजूर केले.

 

महाविकास आघाडी सरकार आणि एमआयडीसीवर भाजपचा आरोप

दरम्यान, तात्कालीन महावकिस आघाडी सरकारने २ लाख ५२ हजार ७२७ चौरस मीटरचा भूखंड रितेश आणि जेनिलिया यांच्या कंपनीला मंजूर केला. ज्या वेगाने एमआयडीसीने रितेश आणि जेनिलिया यांच्या कंपनीला भूखंड दिला. त्या वेगाने एमआयडीसीत काम होत नाही, असे म्हणत भाजपने एमआयडीसीवर सवला उपस्थित केले.

 

Exit mobile version