HW News Marathi
महाराष्ट्र

जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी कोरोना लसींच्या निर्मितीचं लक्ष्य – अदार पुनावाला

पुणे | पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी कोरोना लसी संदर्भात आज अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोना लस वितरणाचा प्लॅनही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीची निर्मिती सुरू असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. आदर पुनावाला आणि सिरममधील संशोधकांकडून त्यांनी लसीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन यााबाबतची माहिती दिली. कोरोना लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं.

कोरोना लसीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याचं सर्वात आधी वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर आशिया खंडात या लसीचं वितरण करण्यात येणार आहे. आमच्याकडे कोरोना लसीच्या वितरणाचा प्लॅनही तयार आहे. येत्या जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी लसींच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची लस तयार झाल्यावर त्याची घोषणा आरोग्य मंत्रालायकडूनच केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहापदरी बायपासमुळे दळणवळण सुलभतेसह विकासाला चालना मिळेल! – नितीन गडकरी

Aprna

आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री !

News Desk

किरीट सोमय्या सोमवारी बॉम्ब टाकणार; ते दोन नेते कोण? तर्कवितर्कांना उधाण!

News Desk