HW News Marathi
महाराष्ट्र

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय

मुंबई | अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदावर्ते हे २५ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरमधील समन्वयक दिलीप पाटील यांनी सदावर्तेंविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज (२१ एप्रिल) कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सदावर्तेंनी विविध मार्गाने पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले असून त्यांचा हिशेब न दिल्याचा आरोप पाटलांनी केला आहे. सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल (२० एप्रिल) पुन्हा एकदा मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सदावर्तेला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात मागणी केली होती. यानुसार, न्यायालयाने पोलिसांची मागणी मंजूर केली. कोल्हापूर पोलीस आर्थर रोडच्या दिशेने रवाना झाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशातून संपत्ती खरेदी केली, सरकारी वकिलांचा आरोप

एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पैशातून सदावर्तेंनी परळ, भायखळ्यामध्ये मालमत्ता घेतली असून एक गाडी खरेदी केल्याचा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला. यावर सदावर्तेंवर म्हणाले, गाडी जुनी असून ती २०१४ मध्ये खरेदी केली आहे. माझ्या गाडीचा आरटीजीएस देखील आहे. गाडी खरेदी केल्यानंतर माझ्या अकाऊंटमधून पैसे गेले आहे. यांची माहिती तुम्हाला मिळेलच. यासाठी तुम्हाला माझ्या कस्टडीची गरच काय ?, परळमधील माझे घर २०१७ मध्ये घेतले असून ते घर वन रुम किचनचे आहे. याचा काय संबंध?, असा सवाल उपस्थित केला आहे.

Related posts

Bhima Koregaon : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

News Desk

… तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल -जयंत पाटील

News Desk

जर आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, उदयनराजेंची मागणी

News Desk