Site icon HW News Marathi

चांदणी चौकातील पूल जमीन दोस्त केल्यानंतर तब्बल ११ तासांनी वाहतूक सुरू

पुणे | पुण्यातील चांदणी चौकातील (Chandni Chowk Bridge) पूल मध्य रात्री जमीन दोस्त झाला. यानंतर तब्बल 11 तासांनी चांदणी चौकातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चांदणी चौकातील पूल 2 ऑक्टोबरच्या मध्य रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी जमीन दोस्त करण्यात आला. यानंतर चांदणी चौकातील पुलाचा ढिगारे टरवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने अवजड वाहने चांदणी चौकापर्यंत थांबली होती.

 

दरम्यान, पूल जमीन दोस्त केल्यानंतर गेल्या दहा तासांहून अधिक उलटूनही ढिगारा हटवण्याचे काम सुरूच आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम काम पूर्ण झाले असून रस्त्याच्या बाजूने ढिगारे उचलवण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामावर पुण्याचे जिल्हाधिकारी कामावर लक्ष ठेवून आहेत. तब्बल 11 तासांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पूल पाडण्यापूर्वी चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती.

 

हा पूल पाडण्यासाठी सुमारे दीड मीटरची १ हजार ३०० छिद्रे पाडले असून त्यामध्ये सुमारे ६०० कि. ग्रा. स्फोटके भरण्यात आली होती. यानंतर मध्ये रात्री 1 वाजून 6 मिनिटाने पूल पाडला. स्फोटकांसाठी पोलीस विभागासह सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. पूलाचा २०० मीटर परीघातील परिसर ब्लास्टपूर्वी रात्री ११ वा. च्या नंतर पूर्णत: निर्मनुष्य करण्यात आले होते.

 

राडारोडा काढण्यासाठी ४ डोझर्स, ८ पोक्लेन, ३९ टिपर तसेच सुमारे १०० कर्मचारी लावण्यात आले असून ब्लास्टनंतर ३० मिनिटात तेथील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सुरक्षिततेची खात्री करुन राडारोडा काढण्यास सुरूवात करण्यात आली. सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण राडारोडा काढला जाऊन मार्ग वाहतूकीसाठी खुला केला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे ८ दिवसात अतिरिक्त मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version