Site icon HW News Marathi

“दारू पिता का?”, कृषी मंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना थेट विचारले

बीड | कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिलेली व्यक्ती आहे. आता पुन्हा एकाद कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहे. कृषी मंत्र्यांच्या जिल्हा अधिकाऱ्याला प्रश्ना विचारतानाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले. यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधकांनी केले. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची पाहाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी मंत्र्यांनी पाहाणी करायला आल्यावर जिल्हा अधिकाऱ्यांशी गप्पा मारताना सर्वांसमोर विचारले की, “दारु पिता का?”, असा प्रश्न विचारला.

अतिृवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री चक्क दारूच्या गप्पा मारत असल्यामुळे बळीराजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. कृषी मंत्र्यांनी थेट जिल्हा अधिकारी यांना सर्वांसमोर विचारले की, दारु पिता का? यावर जिल्हा अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे कधी कधी थोडी घेतो, असे उत्तर दिले. जिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

 

 

Exit mobile version