HW News Marathi
महाराष्ट्र

‘….तर’ यांच्यापाठोपाठ निलेश राणे म्हणाले, दिसेल तिथे संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू!

सिंधुदुर्ग। शिवसेना नेते आणि संजय राऊत आणि राणे पितापुत्रांदरम्यान सुरू असलेलं शाब्दिक युद्ध अद्याप थांबलेलं नाही. भाजप नेते प्रमोद जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? असा सवाल करतानाच संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा आता निलेश राणे यांनी दिला. आता हा इशारा देऊन निलेश राणे यांनी संजय राऊत यांना आव्हानच दिले.

शिवसेना अडवा अडवीची काम करते

शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत केवळ शिवसेना अडवा अडवीची काम करते. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावं आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता याची पुष्टी देखील त्यांनी केली.

शिवसेनेच्या दोन राऊतांना खूप उत आला आहे

भाजप नेते प्रमोद जठार यांनीही राऊतांवर टीका केली होती. शिवसेनेच्या दोन राऊतांना खूप उत आला आहे. त्यांचा लवकरच कार्यक्रम करू, असा इशारा जठार यांनी दिला होता. राणेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राणेंच स्वास्थ उत्तम आहे. आता लवकरचं विरोधकांचं स्वास्थ्य बिघडवतील. भाजपची यात्रा अडवण्याची धमक कोणामध्ये नाही, असंही ते म्हणाले.

राणेंचं मनस्वास्थ बिघडलं राऊत

नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडले. मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, अशी टोलेबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल – नारायण राणे

News Desk

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीची धाड

News Desk

ठरावीक लोकांवर आणि वेळ साधून EDच्या कारवाया, उर्मिला मातोंडकरांची टीका

News Desk