Site icon HW News Marathi

मुंबईसह राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबई। तब्बल दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात महाराष्ट्रसह देशभरात गणेशोत्सवात (Ganeshotsav) पाहायला मिळाला होता. गेल्या दहा दिवसांत सार्वजनिक मंडळासह घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले होते. यानंतर आज अनंत चतुर्दशी लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्त  झाले आहेत. यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकठिकाणी बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीत उत्साहचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
राज्यभरात आज गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोष करत लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जात आहे. मुंबईचा राजा म्हणजे गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला म्हणून पाहिला जातो. मुंबईचा राजा मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर लालबागचा राजाच्या मिरवणुकीची लगबग सुरू झाली आहे. तसेच मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाया, चिंतामणी, खेतवाडी, गिरगावचा राजा आदी बड्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात महत्वाच्या ठिकाणी पोलीस सज्ज झाले आहे. मुंबईत १५,५०० पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवघड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यात भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना वगळ्यात आले आहे.
Exit mobile version