HW News Marathi
महाराष्ट्र

साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ म्हणून करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर ठिणगी पडली. या पार्श्वभूमीवर शिर्डी शनिवारी (१८जानेवारी) मध्यरात्रीपासून ते रविरवारी (१९ जानेवारी) सुरू असलेला बेमुदत बंदला पुकारला होता. यानंतर बंदाच्या काळात साईबाबा मंदिर भक्तांनसाठी खुले होते. मात्र, दुकाने, बाजार मात्र बंद होती. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी झाले होते.

साई जन्मस्थळच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यांनी आज (२० जानेवारी) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली होती. शिर्डी ग्रामस्थांचे ३० जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत ‘पाथरी येथे साईंचा जन्म झाला’ हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी मागे घेतल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी माध्यमांना सांगितले.

‘साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही,’ अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्र्यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ म्हणून विकसित निश्चित झाल्यानंतर साई जन्माचा वाद संपुष्टात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वेळा प्रत्येकाच्या येत असतात ; एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे”

News Desk

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

News Desk

शेतकर्‍यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी

News Desk