HW News Marathi
महाराष्ट्र

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता भाजपच्या खासदारांना धमकीचे पत्र

नांदेड | भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा शोध लागला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या धरणे आंदोलनानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन त्यांना धमकी आलेले पत्र आणि निवेदन दिले.

या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात अली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने नांदेड हादरले होते. बियाणी यांच्या हत्येला १५ दिवस झाले अजून बियाणी यांच्या हत्येचा तपास लागला नाही. नांदेडच्या पोलिसांवर माझा विश्वास नाही, असा आरोप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने करीत आहेत. बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा, मी देशासाठी शहीद झालो !

News Desk

7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात फेरबदल ?

News Desk

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार! – नितीन गडकरी

Aprna