HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना अचानक साक्षात्कार! – राज ठाकरे

मुंबई | “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला,” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंनी आज दादरमधील शिवाजी पार्कात मेळावा घेतला. तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरेंनी मनसे सैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. मनसेचे मेळाव्यात राज ठाकरेंनी गेल्या दोन वर्षातील फ्लॅशबॅक मांडला. यावेळी राज ठाकरेंनी २०१९ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ विधी आणि महाविकासआघाडी स्थापन यावर टीकास्त्र सोडले. 

राज ठाकरे म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकत्र निवणूक लढविली होती. आणि निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. निवडणुकीपूर्वी अडीच अडीच वर्षे ठरली होती. उद्धव ठाकरे म्हणात, मी अमित शहांशी एकांतात बोलोलत, आणि शहा म्हणातात आमच्याशी चर्चा झाली नाही. “एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, साले पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केले हेच समजेना,” असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार आणि फडणवीसांच्या शपथविधीवर मिश्कील टीका केली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला अच्छे दिन येतील, असे वाटत नाही | उद्धव ठाकरे

News Desk

भाजप-मनसे युती होणार का? फडणवीस म्हणतात…

News Desk

राष्ट्रवादीने केली ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याची घोषणा

News Desk