HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा एकदा अजित पवार-देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात एकाच मंचावर येणार!

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या त्या शपथविधीने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हलवून टाकले होते. दरम्यान, ते सरकार तर चालले नाही मात्र काही दिवसांपूर्वी पवार आणि फडणवीस एकाच मंचावर आले होते. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त ते एकत्र आले होते. आता पुन्हा एकदा हाच योग जुळून येणार आहे.अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

पुण्यातील भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनावरुन महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यानंतर सत्ताधारी विरोधकांनी मध्यम मार्ग स्वीकारत देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात १ जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली होती.

माझा आवाज कोणी दाबू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

कोरोना सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.

अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही येणार आहेत म्हणून” अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी केली होती. त्यामुळे यावेळी पवार-फडणवीस यांच्यात काय शाब्दिक युद्ध रंगणार हे पाहणे अतिशय महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अजित पवारांचं नाव आम्ही कधी पासून घेतोय!’ जरंडेश्वर वरील कारवाई वर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

News Desk

बनावटगिरी करुन आणि मिडियाला मॅनेज करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करतेय, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

राज्यातील तुफान पावसाशी राज्य सरकारचे दोन हात, मदतीसाठी तयार केला प्लॅन

News Desk