HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार अन् नवनिर्वाचित कृषिमंत्र्यांची एकमेकांवर स्तुतीसुमने

बारामती | बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय आणि कृषीविषयक कामांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अनिल बोंडे हे सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी कृषी अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार हेही यावेळी उपस्थित होते. “अजितदादांचा आदेश मानून मी बारामतीला आलो. अन्यथा चांगले काम पाहण्यापासून मुकलो असतो”, असे म्हणत डॉ. अनिल बोंडे यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

…तर इथे झालेले काम पाहण्यापासून आपण मुकलो असतो !

दुसरीकडे “शेतकऱ्यांच्या समस्या जाणणारे डॉ. बोंडे हे एकमेव मंत्री आहेत”, असे म्हणत अजित पवारांनी अनिल बोंडे यांचे कौतुक केले आहे. राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी (११ जुलै) बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयाला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी, “अजित पवारांच्या आदेशामुळे आपण बारामती पहायला आलो. इथे आलो नसतो तर इथे झालेले काम पाहण्यापासून आपण मुकलो असतो”, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

शेतीच्या समस्यांची जाण असलेले एकमेव मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा यापूर्वी बारामतीमध्ये आल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले होते. मात्र, संपूर्ण अधिवेशन काळात युतीच्या मंत्र्यांना धारेवर धरलेल्या अजित पवारांनी आता त्याच मंत्र्यांपैकी एक असलेल्या कृषीमंत्र्यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले आहे. “शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. बोंडे हे एकमेव मंत्री असून त्यांना मिळालेला हा कालावधी कमी आहे. मात्र त्यातही ते उत्तम २०-२० मॅच खेळातील”, असेही सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता’, अशी असेल नियमावली!

News Desk

अस्वस्थ ‘कॉर्पोरेट’ लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचललाय !

News Desk

देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो !

swarit