HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांच्या प्रश्नावरुन अजित पवार भडकले!

मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उत्तराखंडच्या दौऱ्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर राज्य सरकारची त्याला परवानगी नसल्यचाचे समोर आलं आणि राज्यपालांना विमानातून खाली उतरावं लागलं. यावरुन ठाकरे सरकारवर भाजपने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी या बद्दल पुर्ण माहिती घेऊन बोलणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र, तरीही वारंवार प्रश्न विचारल्याने अजित पवारांनी पत्रकारांना सुनावले. “राज्याच्या राज्यपालांशी निगडीत घटनेवर राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असताना संपूर्ण माहिती घेऊनच बोलणं योग्य आहे. ज्या घटनेबाबत मला कोणतीही माहिती अद्याप नाही. त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. मंत्रालयात गेल्यावर याबाबत माहिती घेईन”, असं अजित पवार म्हणाले.

ृराज्यपालांच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकाराला सुनावलंराज्यपालांच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकाराला सुनावलं आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरावं लागलं, याप्रश्नावर अजित पवार पत्रकारावर भडकले, “मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला याबाबत काहीही माहित नाही. मी रात्रीपर्यंत कुठे होतो आणि सकाळी कुठे होतो, हे सर्वच तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीबाबत आपण एखादा प्रश्न विचारता त्यावेळी मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देत असताना, पूर्ण त्याबाबतची मला माहिती नसताना, तुम्ही का सारखा सारखा तोच प्रश्न विचारताय. मी आत्ताच सांगितलं की यानंतर मी मंत्रालयात जाणार आहे, मी तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना विचारेन”. राज्यपालांच्या प्रकरणावर मला काहीही माहिती नाही : अजित पवारमला याबाबत काहीच माहिती नाही, आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळलीय, माहिती घेऊन या घटनेवर बोलेन, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं असता “मला या घटनेबाबत कोणतीही माहिती नाही. मी आता इथून मंत्रालयात जाणार आहे. तिथं गेल्यावर याबाबतची माहिती घेईन त्यानंतर बोलेन”, असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा राजीनामा

News Desk

यूपी विधानसभा निवडणुकीआधी मायावती यांची ब्राम्हण समाजासाठी मोठी घोषणा!उ

News Desk

शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna