HW News Marathi
महाराष्ट्र

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीत मंदिरावरील देखील भोंगेही बंद झालेत, असा टोला अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. राज ठाकरेंनी औरंगाबादच्या राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. “जे काही लोकांच्या मनात विष कालवायचे काम करत आहेत. त्या व्यक्तीने कुठला साखर कारखाना उभा केलाय का?, का कुठली सुध गिरणी उभी केली, कुठली शिक्षण संस्था काढली, यांनी काय काम केले मला सांगा,” असा सवाल अजित पवारांनी राज ठाकरेंना केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नाशिक येथील येवला शिवसृष्टी भूमिपूजन समारंभ आज (२ मे) राज ठाकरेंचा घाणाघाती हल्ला केला आहे.

अजित पवार म्हणाले, “जे काही लोकांच्या मनात विष कालवायचे काम करत आहेत. त्या व्यक्तीने कुठला साखर कारखाना उभा केलाय का?, का कुठली सुध गिरणी उभी केली, कुठली शिक्षण संस्था काढली, यांनी काय काम केले मला सांगा. ठिक आहे तुम्ही नाही केले, पण दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली. कधी शब्द खर्ची केला. काही विजन दाखविले, एकही विकास सोसायटी काढली का या पठ्ठ्याने दुध सोसायटी नाही, तर ठरबूज खरबूज सोसायटी, कापूस सोसायटी किंवा मजूर सोसायटी नाही. या सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील की काय सोसायट्या सोसायट्या आहेत. आणि नुसती उच्चलली जीभ लावली टाळ्याला. मानसांचे संसार उभा करायला डोके आणि अक्कल लागते. धुडगूस घालायला आणि मोडतोड करायला अक्कल लागत नाही. आज ज्या पद्धतीने लोकांच्या मनात वेगळ्या पद्धतीने जाती धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदत आहे ना. कुठे अडचण आहे, यासंदर्भात कोणाची वेगळी भूमिका आहे का?, आणि सारखे नाव सांगतात. त्या योगींनी असे केले आणि योगींनी तसे केले. उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी ठिका आहे त्यांनी केले असेल. येवलेकरांनो त्यांची माहिती घ्या. त्यांनी काही भोंगे बंद केले. परंतु, फक्त मशिदीवरील भोंगे बंद नाही केले. मंदिरीवरील देखील लाउडस्पीकर बंद झाले. ही गोष्ट लक्ष्यात घ्या. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणमध्ये भीषण परिस्थिती’, 2005च्या पुनरावृत्तीची भीती!

News Desk

बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केला तर… मुख्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या ‘त्या’ आरोपांमुळे विखेंना मंत्रिपद दिले का ?

News Desk