HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय भूकंप, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (२६ नोव्हेंबर) दिला आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांनी शनिवारी (२३ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यानंतर राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले होते. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत ११ आमदार असल्याचे पत्र भाजपला दिले होते. या पत्राच्या आधारे भाजप-राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने ! अर्णबवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध …

News Desk

ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही

News Desk

मविआ सरकारचा चहापानाचा कार्यक्रम; विरोधकांचा बहिष्कार, मुख्यमंत्री गैरहजर

Aprna