HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचा अर्थसंकल्प: कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज,आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प

मुंबई | आज (८ मार्च) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार २०२१-२२ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. यावेळी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर, राज्यात कोरोना संसर्गाची महामारी पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्यामुळे त्यासाठी प्रतिबंधक योजना सरकार करत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी जी कामगिरी केली त्यासाठी त्यांना विशेष सूट देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प

  • -आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प
  • आरोग्य विभागात २९०० कोटी मंजूर
  • वैद्यकिय विभागात १५१७ कोटी
  • मनपा क्षेत्रात ५ वर्षांत ५ कोटी तर यंदा ८०० कोटी
  • जिल्हा रुग्णालय, मनो रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणार
  • संसर्ग जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार
  • उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावतीत मेडिकल कॉलेज उभारणार
  • संसर्गजन्य रोगांचे प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल उभारणार
  • डॉक्टरांच्या पदवीच्या १९९०, पदव्युत्तर १००० जागा वाढणार
  • PPP मॉडेलवर आरोग्य सेवा उभारणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : बंडखोर उमेदवारीचे भाजपला मोठे आव्हान

News Desk

एकाचा मुदडा पाडून लुटला पेट्रोलपंप

News Desk

दिवाळीनंतर ९वी ते १२वीचे वर्ग सुरु करणार, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करणे गरजेचे

News Desk