HW News Marathi
महाराष्ट्र

रेणू शर्मा प्रकरणाचा मुंडे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला – अजित पवार 

पुणे | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्याची जाणूनबुजुन बदनामी करणे चुकीच आहे. मंत्री धनंजय मुंडेंबाबत स्पष्ट चित्र समोर येऊ दिलं नाही, अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“एखाद्या नेत्याला तयार होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. धनंजय मुंडेंनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांनी परळी मतदारसंघात भाजपच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. रेणू शर्मा प्रकरणाचा मुंडे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. असा कोणी आरोप केला तर त्या व्यक्तीची बदनामी होते. विरोधक त्यावर बोट ठेवतात”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होय, मी आणि सदाभाऊ खोत ST कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबदारी घेतो, पण…!

swarit

पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी वाढले

News Desk

“कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा करतो”, राऊतांचा मोदींना टोला

News Desk