पुणे | राजकीय वर्तृळात कधी काय फासे पलटतील याचा नेम नाही. अशात गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटी अनेक नेते मंडळी घेत आहेत. अशात आज (११ जून) शरद पवार यांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असून प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज पुण्यात ते बोलत होते.
अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल देखील माहिती दिली आहे. यावेळी पत्रकारांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारलंत्या. तेव्हा उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले आहेत.
राजकीय रणनीती आखण्याचं काम प्रशांत किशोर यांनी सोडलं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.