HW News Marathi
महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटलांच्या शेजारी अजित पवार बसले ,कारण …

पुणे | पुण्यात मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील शेजारी बसलेले. एकमेकांवर टिकेच्या माध्यमातुन आग ओकणाऱ्या या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहुन सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या कार्यक्रमावेळी दोघांमध्ये गप्पाही झाल्या. पण या कार्यक्रमात हे होघे नियोजन नसताना एकत्र का बसले ? या प्रश्नावर अजित पवारांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं.

हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात तुम्ही जागा का बदलली ,या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वत:हून जागा बदलून घेतली होती. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटकाळी स्त्री हि पुरुषापेक्षा जास्त नेटाने उभी राहते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

निता अंबानी साईबाबांच्या चरणी

News Desk

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

News Desk