HW News Marathi
महाराष्ट्र

“तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले  

मुंबई | विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचे गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वकष विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

विधान परिषदेतील १२ आमदारांची नियुक्ती जाहीर होणेही तितकंच महत्वाचे असल्याचे सांगून या मुद्‌याकडेही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभेत उपस्थित एका चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही दिली.

“विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीने होणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीची घोषणाही तातडीने होणे आवश्यक,” असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवारांनी काय उत्तर दिले?

“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk

राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावल्यामुळे गुन्हा दाखल

Aprna

मी प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला

News Desk