HW Marathi
Crime Report महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा आरोप, तर यावर सोमैय्या म्हणतात-

ठाणे | भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवले, तसंच धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्यानुसार चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली

कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी एखाद्याने चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्याप्रमाणे योग्य ती चौकशी झाली पाहिजे, असं सष्ट मत व्यक्त केलं आहे. अनिल परब यांनी मंगळवारी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Related posts

अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरवले !

News Desk

अयोध्येचे निमंत्रण आले असते तरी मुख्यमंत्री गेले असते का? कारण सध्या त्यांची फजिती झाली आहे – गिरीष महाजन

News Desk

ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर होणार का ?

Gauri Tilekar