HW News Marathi
महाराष्ट्र

अमित ठाकरेंनी शिक्षकांसाठी केलेली ‘ही’ मागणी झाली पूर्ण

मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आझाद मैदानात शिक्षकांचे जे आंदोलन सुरु होते त्या शिक्षकांच्या मदतीसाठी अमित ठाकरे थेट मैदानात उतरले होते. अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची अमित ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली होती.

अनुदानासाठी अनेक दिवसापासून आंदोलन करत असलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांचा प्रश्न अखेर अमित ठाकरे यांच्या पुढाकारामुळे सुटला. हजारो शिक्षकांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी मान्य झाली आहे.

या संदर्भात काल (१७ मार्च) गायकवाड यांनी शिक्षकांच्या मागण्या संदर्भात शासन निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार सदर शासन निर्णयाचा लाभ ३३ हजार १५४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. सन २०२०-२१ करिता यासाठी १४०.३७ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सदर पदांवर वार्षिक आवर्ती खर्च ४२१.११ कोटी इतका होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्यांतील विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना २० टक्के अनुदान २०२० च्या अर्थसंकल्पात मंजूर झाले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा निधी वितरीत करण्यात आला नव्हता. हा निधी मिळावा, अनेक दिवसांपासून राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला भेट देत अमित ठाकरेंनी ११ फेब्रुवारीला भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्यन करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शिक्षकांचा प्रश्न सुटला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी केलं मोदींचं कौतुक!

News Desk

थोड्याच वेळात होणार आर्यन खानची तुरुंगातून सुटका

News Desk

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

News Desk