HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं!

मुंबई | माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या छंदाविषयी सगळ्यांनाच माहित आहे. गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने हे गाणं लाँच करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ही घोषणा केली होती.

आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही हीट ठरणार का?

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेश वंदनेचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, तसा तुम्हालाही होईल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. आता अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही हीट ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही

महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांगली गोष्ट करताना गैरमार्ग वापरला, तर हेतू कधीही शुद्ध नसतो, उच्च न्यायालयाने सुजय विखेंना सुनावलं

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवली

News Desk

“आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार”

News Desk