HW News Marathi
महाराष्ट्र

हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान!

मुंबई | देशात २१ जूनपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून लसीकरणाचा वेग वाढला असून ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.

भारतातील लसीकरण मोहिमेत हा मोठा पल्ला गाठल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटसोबत भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली आहे.

 

लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक (३२,३६,६३,२९७) लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण | पीडितेची मृत्यूशी झुंज, आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

swarit

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

दिवसाढवळ्या भररस्त्यात खून झाल्याने बीड शहरात खळबळ

News Desk