HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील लोकप्रतिनिधीची महत्वपूर्ण बैठक

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (२६ जून) लोकप्रतिनिधींसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थितीही सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

पुण्यात काल (२५ जून) एका दिवसात ७२५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २४० वर गेली आहे. तर १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ६५५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सलग दोन दिवस पाचशे पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

या सर्वपक्षीय बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk

कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार

News Desk

HW Exclusive : अबब…एका महिन्यात कमावले साडे चार लाख रुपये !

News Desk