Site icon HW News Marathi

शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला; आंबादास दानवेंचे पोलीस महासंचालकांना पत्र

मुंबई | माजी मंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आहे. या शिव संवाद (Shiv Samvad Yatra) यात्रेच्या कार्यक्रमानिमित्ताने औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर मंगळवारी (7 फेब्रुवारी) सायंकाळी औरंगाबाद त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना झाल्याने एकच खळबळ झाली. आदित्य ठाकरेंच्या गाडीवर शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावात आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरू झाल्याने हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती माध्यमातून मिळाली आहे. या मिरवणुकी वेळी डीजे बंद करण्याला सांगितल्यानंतर वाद सुरू झाला. यानंतरच आदित्य ठाकरे आणि आंबादास दानवे यांच्या गाडी आडविण्याचा प्रयत्न झाला होता. तर त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेकची घटना झाली. तसेच शिव संवाद यात्रेची सभा सुरु असताना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञानाने स्टेवर गोंदळ घालत दगड फिरकाविला होता. यानंतर सभे काही वेळेसाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

आंबादास दानवेंचे पोलीस महासंचालकांना पत्र

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “काही लोकांना वातावरण बिघडवायचे असेल. परंतु, या शिवसंवाद यात्रेत शेतकरी बांधवांसोबत संवाद होत आहे.” या घटनेनंतर आंबादास दानवेंनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले होते. यात आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत मंगळवारी (7 फेब्रुवारी ) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे ग्राम सचिवालयासमोर मैदानात जाहीर सभा सुरु असाता अज्ञात जमावाकडून दगड फिरकविण्यात आला होता. ही सभा संपल्यानंतर येथून निघताना आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक झाली, असे पत्रात लिहिले आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version