HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल- अतुल भातखळकर

मुंबई । शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येईल,अस वक्तव्य पुण्यात केलं होतं. आणि आता याच वक्तव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही, असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावला आहे.‘महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार. महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’ असं ट्वीट करुन भातखळकरांनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली आहे.

तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल

होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभे आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल.

आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आता पासूनचमोर्चेबांधणी सुरू केली आहे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांची बैठक झाली. त्यावेळी आमच्याकडे दोन तीन जणांची नवे पुढे आली. परंतु मी कुठलाही वेळ ना लावता उद्धव ठाकरेंचा हात धरुन वर केला. आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. मात्र उद्धव ठाकरे तयार नव्हते. मात्र माझ्या एका शब्दावर त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केलं, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपुरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याचे मुनगंटीवार यांचे आदेश

News Desk

मंत्री पदाच्या लेटर हेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे

Aprna

डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

News Desk