HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांची पत्नी ईडीच्या चौकशीला गैरहजर

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आरती देशमुख चौकशीसाठी काल (१५ जुलै) गैरहजर राहिल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रकृतीच्या कारणास्तव त्या कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलामार्फत कळविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, अनिल देशमुख देखील चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. आता चौकशीला सामोरं न गेल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

अनिल देशमुख यांना याआधी तीनवेळा तर त्याचे पुत्र ऋषिकेश यांना ईडीने एकवेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी चौकशीला हजर राहणे टाळले आहे. आता आरती देशमुखही गैरहजर राहिल्याने ईडी कोणती कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. आरती यांना गुरुवारी सकाळी अकरा वाजता बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर राहण्याबाबत बुधवारी समन्स बजावले होते. मात्र, त्यांना विविध आजार आहेत, कोरोनाच्या संसर्गामुळे घराबाहेर पडणे अशक्य आहे, तसेच त्या गृहिणी असून कोणत्याही व्यवसायात सक्रिय नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी कालच स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने परत बोलवावे! – नसीम खान

News Desk

सामना वृत्तपत्र कधी वाचलेच नाही आणि आमच्या जिल्ह्यात पेपर येतही नाही – गोपिचंद पडळकर

News Desk

‘तुम्ही सगळे महाराज एकत्र या, मग होऊन जाऊद्या आमने-सामने’, शिवसेना आमदाराचे वक्तव्य

News Desk